कान्हूर पठार पतसंस्था
आमच्याविषयी
१९८४ पासून सर्वसामान्यांची हक्काची पतसंस्था
आमचा इतिहास
एका डेस्कपासून १७ शाखांपर्यंत
कान्हूर पठार हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्याची ओळख कायम दुष्काळग्रस्त तालुका अशी राहिलेली. हाताला कामधंदा नसल्याने तालुक्यातील बहुतांश लोक नोकरी वा व्यवसायाच्या उद्देशाने पुणे व मुंबई यांसारख्या शहरांत स्थिरावले होते. शेतकऱ्यांना आर्थिक वाली नसल्याने खाजगी सावकारांवर अवलंबून राहावे लागत होते; त्यामुळे खाजगी सावकारांचा सुळसुळाट झाला होता.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आपल्या हक्काची वित्तीय सेवा मिळावी या हेतूने सन १९८४ साली कान्हूर पठार पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. अतिशय छोट्या खोलीत एका डेस्कवर संस्थेचे कामकाज सुरू झाले. तत्कालीन संचालक मंडळ व गावातील हितचिंतकांच्या मदतीने अल्पावधीत रु. १४ लाखांच्या ठेवी जमवून संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला.
ग्राहकांच्या गरजा आणि सभासदांचा विकास याच ध्येयाने संस्था अविरतपणे काम करत राहिली. अल्पावधीतच संस्थेचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या पलीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारले. दरवर्षी ठेवींचे नवे उच्चांक गाठत संस्था जिल्ह्यातील इतर पतसंस्थांसाठी एक आदर्श पतसंस्था म्हणून नावारूपास आली आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविली गेली.
सन २०१० मध्ये संस्थेचे मल्टिस्टेट पतसंस्थेत रूपांतर झाले; संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व राजस्थान झाले आणि संस्था देशपातळीवर पोहोचली. आज संस्थेच्या शहरी व ग्रामीण भागात १७ शाखा असून त्यापैकी १२ शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने चालतात; संस्थेचे स्वतःचे डाटा सेंटर असून कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब केलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य सभासदाला जलद व तत्पर सेवा देणे सोपे झाले आहे.
उत्कृष्ट व्यवस्थापन व शिस्तबद्ध कारभारामुळे तालुक्यात आर्थिक शिस्त असणारी पतसंस्था अशी संस्थेची ओळख निर्माण झाली. नोटाबंदी तसेच कोरोना काळातही आर्थिक नियोजनामुळे संस्था भक्कमपणे उभी राहिली. सन २००० मध्ये उभी राहिलेली मुख्यालय इमारत, दरवर्षीच्या नफा वाटणीतून उभारलेल्या इमारत निधीतून अत्याधुनिक सेवा-सुविधांसह नूतनीकृत करण्यात आली असून आज ती तालुक्यातील भव्य कार्पोरेट वास्तू म्हणून उभी आहे. संस्थेला सतत ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला असून संस्था दरवर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश देत आहे.
आमचे ध्येय (Mission)
शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य सभासदांना हक्काची, सुरक्षित व तत्पर वित्तीय सेवा देऊन ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे आणि सभासदांचा सर्वांगीण आर्थिक विकास साधणे.
आमचा दृष्टिकोन (Vision)
सहकाराच्या मूल्यांवर आधारित, प्रत्येक कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारी सर्वात विश्वासार्ह आर्थिक संस्था बनणे.
कान्हूर पठार पतसंस्था
आमची मूल्ये
विश्वास
सभासदांचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती.
पारदर्शकता
स्पष्ट अटी, खुला कारभार.
सेवा
आपुलकीने आणि तत्परतेने सेवा.
सहकार
सर्वांच्या सहभागातून सर्वांचा विकास.
१९८४ – आज
आमचा प्रवास
-
१९८४
पतसंस्थेची स्थापना
२४ मे १९८४ रोजी एका छोट्या खोलीत, एका डेस्कवर कामकाजास सुरुवात; अल्पावधीत रु. १४ लाखांच्या ठेवी.
-
२०००
मुख्यालय इमारत
कान्हूर पठार येथे संस्थेची स्वतःची मुख्यालय इमारत उभी राहिली.
-
२०१०
मल्टिस्टेट दर्जा
१० सप्टेंबर २०१० रोजी मल्टिस्टेट नोंदणी (MSCS/CR/364/2010); कार्यक्षेत्र महाराष्ट्र व राजस्थान.
-
२०१५-१६
राज्यस्तरीय सन्मान
सर्वोत्तम पतसंस्था व सर्वोत्तम बँको पुरस्कारांनी गौरव; त्यानंतर दरवर्षी अनेक पुरस्कार.
-
आज
१७ शाखा व कार्पोरेट मुख्यालय
१२ शाखा स्वमालकीच्या इमारतींत, कोअर बँकिंग, स्वतःचे डाटा सेंटर व नूतनीकृत मुख्यालय.
पुरस्कार व सन्मान
पुरस्कार व सन्मान
संस्थेच्या कामगिरीची राज्यस्तरावर घेतलेली दखल.
-
२०२३-२४
राज्यस्तरीय सर्वोत्तम बँको पुरस्कार
-
२०२३-२४
नवभारत पुरस्कार
-
२०२२-२३
बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार
-
२०२२-२३
राज्यस्तरीय सहकार गौरव पुरस्कार
-
२०२२-२३
राज्यस्तरीय महिला बेस्ट चेअरमन व बेस्ट सीईओ पुरस्कार
-
२०२१-२२
राज्यस्तरीय सर्वोत्तम बँको पुरस्कार
-
२०१८-१९
राज्यस्तरीय बिझनेस एक्सप्रेस श्री पुरस्कार
-
सलग दोन वेळा
नचिकेत प्रकाशनतर्फे राज्यस्तरीय सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार
-
सलग दोन वेळा
महाराष्ट्र राज्य बहुराज्यीय पतसंस्थांमधून प्रथम क्रमांकाचा बँको पतसंस्था पुरस्कार
-
२०१७-१८
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनतर्फे दीपस्तंभ पुरस्कार
-
२०१७-१८
महाराष्ट्र राज्य मल्टिस्टेट फेडरेशनतर्फे गोवा व कर्नाटक राज्यांतून बेस्ट सीईओ (कार्यकारी संचालक) पुरस्कार – भारत सरकारच्या सहकार विभागाचे संयुक्त सचिव श्री. सय्यद अब्बास यांच्या हस्ते संस्थापक व तत्कालीन कार्यकारी संचालक कै. दिलीपराव ठुबे यांना प्रदान
-
२०१६-१७
महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन (उत्तर विभाग) सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार
-
२०१६-१७
सर्वोत्तम बँको पुरस्कार
-
२०१५-१६
सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार तसेच सर्वोत्तम बँको पुरस्कार
नोंदणी क्र.
नोंदणी व कायदेशीर माहिती
- संस्थेचे नाव
- कान्हुर पठार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी मर्या.
- संस्थेचा प्रकार
- सहकारी संस्था
- स्थापना दिनांक
- २४/०५/१९८४
- मूळ नोंदणी क्रमांक
- ANR-PNR-RSR-1276
- मल्टिस्टेट नोंदणी क्रमांक
- MSCS/CR/364/2010
- मल्टिस्टेट नोंदणी दिनांक
- १०/०९/२०१०
- नोंदणी कायदा
- बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम, २००२
- कार्यक्षेत्र
- महाराष्ट्र व राजस्थान
- ऑडिट वर्ग
- ‘अ’ (सतत)
- मुख्य कार्यालय
- मु.पो. कान्हूर पठार, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र – ४१४३०२
कान्हूर पठार पतसंस्था
आजच आमच्या परिवाराचे सभासद व्हा
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा आम्हाला संपर्क करा.