श्रीमती सुशिला दिलीप ठुबे
चेअरमन
कान्हूर पठार पतसंस्था
संस्थापकांचा वारसा, अनुभवी नेतृत्व

आमचे प्रेरणास्थान
संस्थापक · स्मृतिशेष
सन १९८४ मध्ये शेतकरी व कष्टकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवणारे आणि कार्यकारी संचालक म्हणून बेस्ट सीईओ पुरस्काराने सन्मानित झालेले आमचे संस्थापक. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
चेअरमन यांचे मनोगत
प्रिय सभासद बंधू-भगिनींनो,
सन १९८४ मध्ये आमचे संस्थापक कै. दिलीपराव ठुबे यांनी शेतकरी व कष्टकरी बांधवांना हक्काची वित्तीय सेवा मिळावी या ध्येयाने एका छोट्या खोलीत या पतसंस्थेची सुरुवात केली. त्यांनी रुजवलेली प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सेवाभाव ही मूल्ये आजही आमच्या कामकाजाचा पाया आहेत.
सन २०१० मध्ये मिळालेला मल्टिस्टेट दर्जा, १७ शाखांचे जाळे, कोअर बँकिंग प्रणाली आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कार ही सर्व आपल्या विश्वासाचीच फळे आहेत. आपल्या ठेवी सुरक्षित ठेवणे, गरजूंना वेळेवर कर्जपुरवठा करणे आणि प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता जपणे ही आमची बांधिलकी आहे.
आपल्या साथीबद्दल मनःपूर्वक आभार!
श्रीमती सुशिला दिलीप ठुबे
चेअरमन
कान्हूर पठार पतसंस्था
चेअरमन
व्हाईस चेअरमन
कार्यकारी संचालिका
कान्हूर पठार पतसंस्था
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा आम्हाला संपर्क करा.